आणखीन मोहोरा सापडल्या!  मोहब्बत/मोहोब्बत, चेहरा/चेहेरा, पेहराव/पेहेराव, मेहरबानी/मेहेरबानी  इत्यादी.  यांवरून एक लक्षात येते, की हे सर्व शब्द उर्दू आहेत. उर्दूमध्ये शब्द लिहिताना अक्षरांना इकार-उकार लावायची पद्धत नसते.  त्यामुळे हिंदी-मराठीत लिहिताना लहर-लहेर-लेहर-लेहेर, लेहंगा/लेहेंगा, कुतब/कुतुब, वाकफ़‌/वाकिफ़‌, मुआफ‌/माफ‌, युसफ़‌/युसुफ़‌ हे उर्दू शब्द दोन-तीन पद्धतींनी  लिहिता येतात. त्यामुळे मराठीत लिहिताना शब्दातल्या ह च्या आधी येणाऱ्या अक्षराला जे मात्राचिन्ह असेल तेच ह ला दिले तरी चालते.
आपणही वाडवडलांना/वाडवडिलांना किंवा झाडीझुडुपांच्या/झाडाझुडपांच्या हे शब्द दोन प्रकारे लिहितो.
ललित कथा लिहिताना घटनेचे वर्ष लिहिण्यात गलती झाली तरी चालते. इंग्रजी भाषेच्या पेपरात 'बॉर्न'चा उपयोग करून लिहून दाखवलेल्या  वाक्यात शिवाजी वॉज़‌ बॉर्न इन नाइनटीन थर्टिसिक्स असे लिहिले तरी पूर्ण गुण मिळतात.   पानशेतच्या पुराची तारीख १९६२ लिहिण्यात कदाचित गलती नसेलही;  आजी-आजोबांकडून मिळालेल्या पारंपरिक ज्ञानावर श्रद्धा हवीच.--अद्वैतुल्लाखान