भाषा आवड म्हणून शिकण्यापेक्षा गरज म्हणून शिकावी लागली तर ती टिकण्याची शक्यता वाढत असावी.

जर्मन भाषा शिकण्याविषयीचा माझा अनुभव वेगळा आहे. अर्थात येथे टिकण्याचा संदर्भ वैयक्तिक स्तरावर ती भाषा किती लक्षात राहिली / उपयोगीपडली एवढ्यापुरताच आहे.

आयायटीत असताना ब्रेख्तच्या 'मदर करेज... ' या नाटकाच्या इंग्रजी भाषांतरांवरून मी मराठीत भाषांतर केले होते तेव्हापासून जर्मन भाषेविषयीकुतूहल होते. पुढे पुणे विद्यापीठाचा तीन वर्षांचा जर्मन भाषेचा अभ्यासक्रम (सायंकालीन वर्गात जाऊन) मी पुरा केला आणि पुढे जवळ जवळ दहा वर्षे जर्मन भाषेशी काहीही संबंध आला नाही. अमेरिकेत आल्यावर एका ग्रंथालयात जर्मन लघुकथांचे एक पुस्तक बघितले आणि म्हटले बघूया तरी किती वाचता येते.

आलेला अनुभव माझ्या मलाच अतिशय आश्चर्यकारक वाटला. जवळ जवळ ८०-९०% मजकूर मी विनासायास वाचू/आस्वादू शकलो. केवळ आवडीने शिकल्यामुळे असे झाले असे माझे मत बनले