महोदया,

प्रतिज्ञा या शब्दाचा अपभ्रंश प्रथम प्रतिज्जा मधे झाला. नंतर पैज आला, असे काहीसे आठवते. पाली भाषेतले अनेक शब्द तपासून बघावेत.

प्रज्ञा या शब्दाला बहुतेक पालीत प्रज्जा किंवा प्रज्जेच्या आसपासचा शब्द आहे.

ज्ञ या शब्दाच्या मराठीतल्या सद्य उच्चारामुळे या प्रतिज्ञेची पैज कशी काय होऊ शकते, याबद्दल आपला गोंधळ उडाला असावा. मी चूक असल्यास लगेच सांगावे.

चित्तरंजन