prajkta येथे हे वाचायला मिळाले:
केबीनमधून खाडकन आवाज आल्याने बाहेरचे सगळे काम टाकून केबीनच्या दिशेने धावले. तेवढ्यात केबीनचे दार धाडकन ढकलून "तो' रुबाबदार तरूण बाहेर आला. त्याने बाहेर जमलेल्यांवर तुच्छतेने एक नजर टाकली आणि तो तडक तेथून बाहेर पडला. त्याला पाहत पाहत केबीनबाहेर जमलेही आपापल्या जागेवर जाऊन बसले.