दुजेविण संवादु येथे हे वाचायला मिळाले:
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज जपानमध्ये अनेक भारतीय उपहारगृहे दिसतात. दर ३०० मिटरवर एक भारतीय उपहारगृह आहे. अर्थात सगळीकडे भारतीय कर्मचारी असतील असे नाही. बऱ्याच ठिकाणी नेपाळी मालक असतात. कर्मचारी भारतीय किंवा जपानी. पण भारतीय सोंग आणण्यासाठी बायका पंजाबी पोषाख करणार व कुंकू लावणार. भिंतीवर गणपतीची तसबीर व एखादे ओमचे चिन्ह व ताजमहालचा फोटो.