हिंदू धर्म ( जिवन पद्धती नाही ) जगभर पटत आणि पसरत चाललाय हे तर त्रिवार सत्य आहे. आपल्या लोकांनी फक्त तो विचारांनी आणि आचारांनी
जगाला पटवून द्यायला हवा.ज्युलिया रॉबर्टसन , भगिनी निवेदिता असे बरेच उदा. आहेत आज हि ब्राझिलच्या जनतेचा भारतिय धर्माकडे ओढा हा
दिसतोच . मायाजाला अंतर्गत जो गप्पाष्टकांचा खेळ खेळतात ,तर त्यात बऱ्याच लोकांना हा अनुभव आलेला आहे की जी पारीवारीक सुरक्षितता हिंदू
धर्मात आहे ती इतरत्र आढळण्याचे प्रमाण तसे कमीच . आपण भावनिकरित्या एकमेकांशी जास्त लवकर जोडले जातो ही देखिल आपल्या जमेची बाजू आहे. आपण आज हि शेजारच्यांना मामा , काका , आत्या ,मावशी असेच संबोधतो मिसेस पाटिल मिसेस चितळे असे नाही आपण भावनेवर जगणारी माणसे आहोत त्यामुळे हे मुद्दे जगासमोर ठळक वैशिष्ट्यांसह आले तर तो निश्चितच पटेल आणि पसरेल.