मुंबईत मराठीभाषक १९८१मध्ये फक्त ४४ टक्के होते, आता कितीतरी कमी असणार.  मुंबईत शिक्षणाचे माध्यम राज्यभाषा ठेवणे शक्य आहे? आणि तसले शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी‌ काय राज्यातच सडायचे?
रेल्वेने प्रवास करताना परवा दोन मराठी  मुले भेटली. नुकतीच मास्कोहून वैद्यकीय शिक्षण संपवून दिल्लीला चालली होती. अस्खलित आणि शुद्ध मराठी बोलत होती. त्यांच्याकडून समजले, की त्यांना रशियात पोचल्यापोचल्या पंधरा दिवसात रशियन भाषेची तोंडओळख करून दिली गेली होती.  पुढे दोन वर्षे रशियन भाषेचा तास आठवड्याला एक होता. उद्देश एवढाच की रशियन पुस्तके वाचता यावीत. बाकी संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून होते. प्राध्यापक उत्कृष्ट इंग्रजी बोलत असत. विद्यार्थी जगाच्या अनेक देशांमधून आलेले होते; अगदी अमेरिकन विद्यार्थीसुद्धा होते.  कारण उघड आहे ! इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेली मुले आपल्या देशाला परत जातील आणि जगभरात कुठेही व्यवसाय करू शकतील..रशियन भाषेत शिक्षण मिळाले असते तर त्यांना रशियातच ठेवून घ्यावे लागले असते. महाराष्ट्रात राज्यभाषेतून शिक्षण घेतलेल्यांना महाराष्ट्रामध्ये ठेवून घ्यावे?  ---अद्वैतुल्लाखान