मला नाही पटले. रशियात कदाचित मेडिकलचे ज्ञान इंग्रजीत देण्याची सोय असेल. काही विद्यापीठात इंग्रजीतून शिक्षण घेण्याची सोय केल्या जात आहे, असे इथे असलेल्या रशियन प्राध्यापकाकडून कळले.

महाराष्ट्रातही उच्च शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आहे, आणि इंग्रजीत ज्ञान दिल्याही जाते. पण तरीही प्राध्यापक सर्वकाळ इंग्रजीत बोलत नाहीत. तसेच तिथेही असावे.

 मी स्वतः सध्या कोरियात शिक्षण घेत आहो. इथल्या ९०% प्राध्यापकांना उत्कृष्ट इंग्रजी येते, पण ते कोरिअनच बोलतात. २-४ प्राध्यापक वगळता इतर त्यांचा अभ्यासक्रमही कोरियन भाषेतच शिकवतात. इथे परदेशी विद्यार्थ्यांना कोरियन भाषा शिकावी लागते, पण आठवड्याला ३ तास शिकूनही संभाषण अजूनही जमत नाही, आणि तरी इथल्या वासरांमध्ये मी लंगडा बैल आहे  

 वर लिहिल्याप्रमाणे उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तकांचे कोरियन भाषेत भाषांतरही केले आहे. यासोबत या विद्यार्थ्यांना  इंग्रजी एक भाषा म्हणून शिकावी लागते. टोईक वा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याखेरीज विद्यापीठात प्रवेश नसतो. आणि इथून कित्येक विद्यार्थी अमेरिका, ब्रिटन वा ऑस्ट्रेलियासारख्या इंग्रजी देशात नोकरीसाठी जातात.

जपानमध्येही असच आहे. पण त्यांची प्रगती का व्हावी ?

असो. १० कोटी मराठी माणसांपैकी किती लोकं परदेशी / परराज्यात जातात ? मग त्या छोट्याश्या संखेकरिता इतरांना दावणीला का बांधावं ? आणि राहिला प्रश्न इंग्रजीचा, तर कोणतीही भाषा शिकण्याला माझा विरोध नाही, पण शिक्षणाचे माध्यम बनवणे चुकीचे वाटते. इंग्रजी जवळजवळ ८ वर्ष शिकूनही आम्ही काय दिवे लावले ? (वर्ग ५ ते पदवी भाग १). इंग्रजी शिकवण्याची पद्धत बदलवली पाहिजे, त्याला माध्यम बनवण्यात अर्थ नाही. आणि भारताचा विचार करता सर्व तांत्रिक (की पारिभाषिक ? ) शब्द सारखे असेल तर काहीही अडचण येणार नाही.

मी हे म्हणेन की सर्वच विषय सोप्या भाषेत शिकवल्या गेले पाहिजे. त्यासाठी वापरात असलेले शब्द वापरावे. तांत्रिक शब्द ज्या भाषेतील असतील ते तसेच्या तसे घ्यावे. उगाच संस्कृतमधून शोधून काढू नये, म्हणजे मग चर्चा मराठीत असो किंवा इंग्रजीत विद्यार्थी सहज आपले म्हणणे मांडू शकतील.

अवांतर :- सोपी भाषा न वापरण्याचे नुकसान.

उदा. १ :- गांधीजींनी ..... च्या विरुद्ध ब्र ही उच्चारला नाही -> मग ते ब्रिटिश कसे म्हणत होते?  

उदा. २ :-१.  ब्रिटिशांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसे. (इतिहास). २. नॉर्वेला २४ तासाचा सूर्य असतो. (भूगोल) (चुभुदेघे) -> म्हणजे ब्रिटिशांचे नॉर्वेवर राज्य होते