म्हणजे १९६० पासून १९८१ पर्यंत आम्ही मुंबईत इतर माध्यमाचा शाळा चालू दिल्या त्याचाच हा परिणाम आहे. असं कोलकाता, चेन्नई किंवा दिल्लीततरी झालं का ? आम्ही (काँग्रेसी सरकार) झोपाळू .. अजून काय ?

राहिला प्रश्न मुंबईच्या इतर ५६% चा, (अंदाजे ५६ लाख),  त्यांच्यासाठी इतर ९ कोटी लोकांना त्रास ?

एकदा का तुम्ही मराठी (किंवा इतर कोणतीही) भाषा शिकण्याची गरज नाही म्हटलं की ती भाषा दुरावतेच. अगदी अपवाद म्हणून काही लोक असतीलही.

ज्यांनी दुसरी/ तिसरी भाषा म्हणून हिंदी, संस्कृत, जर्मन वा मराठी भाषा शिकली असेल ते पुढे जाऊन त्या भाषेचा किती वापर करतात ? (श्रवण, संभाषण,  वाचन आणी लेखन).