धर्माच्या अनेक व्याख्या आपल्याकडे दिलेल्या आहेत. "धारणात्धर्ममित्याहू धर्मोधारयते प्रजा"
ही एक व्याख्या समाज धारणे साठी धर्माची आवश्यकता अधोरेखित करते.
या ठिकाणी धर्म म्हणजे देव, अध्यात्म, पारलौकिक अनुभव, उपासना पद्धती हा नसून, लोकव्यवहार, सामजिक नियम, कौटुंबिक नियम वगैरे.
धर्माची अधिक व्यापक व्याख्याः "यतो अभ्युदयनिश्रेयससिद्धी स धर्मः"
ज्या योगे मनुष्याची भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती होते तो धर्म. यात समाज पद्धती, संस्कृति, नितिनियम, हे सर्व "भौतिक प्रगती" साठी आवश्यक, तर त्यातील आध्यात्मिक भाग (उपासना पद्धती, साधना वगैरे), "आध्यात्मिक" प्रगती साठी आवश्याक. आध्यात्मिक साधना, उपासना, ही अतिशय खाजगी बाब आहे. ही खाजगी बाब जेव्हा सामजिक होते, किंवा ऐच्छिक न राहता लादली जाते, तेव्हा कलहाला सुरुवात होते.
मी किंवा अमुक म्हणतो तोच सत्याप्रत, देवाप्रत जाण्याचा एकमेव मार्ग आहे असे म्हणणार्यांमुळे मुळात शांतता स्थापणे, व्यवस्था लावणे या हेतुसाठी निर्माण झालेले धर्म अशांततेचे कारण बनतात.