परिस्थिती हि कायम बदलणारी गोष्ट आहे, मुद्दा असा की ती बदलविण्यासाठी आपण काय करतो. आपल्या घरापासून सुरवात करायची झाल्यास कीती घर आज संस्कारक्षम राहिली आहेत. आपल्या संस्कारांना पुनर्जिवित करावे लागेल जे काळाच्या ओघात लोप होत चालले आहे.
आपण परिस्थिती बघतो ती हि एखाद्या समिक्षका सारखी , इथे समिक्षक , परीक्षका पेक्षा कृतीदक्ष असल्याशिवाय परिस्थिती कशी बदलणार
कीमान पक्षी जिथे शक्य असेल तिथे घरातिल सर्वव्यक्तिंनी दिवसातून एका वेळेस तरी सामूहिक भोजन घ्यायला हवे. सायंकाळी निदान एकदा तरी देवाजवळ बसायला मुलांना शिकवायला हवे. हि सर्वी आपली बलस्थान आहेत हि जर वाढली तर परिस्थिती बदलणार नाहि?. नाविन्य आत्मसात करत असतांना जुन्याची काय आवशक्यता आहे हे तपासून पाहून ते जपायला लागेल, तेंव्हा आज ती पटत चालली आहे ती पसरत जाईल. आणि
खात्रीने बदलत जाईल...... ऽऽऽऽ अपेक्षा!