जेथे विज्ञान संपते तेथून अध्यात्म चालू होते. विज्ञानाची एक गोष्ट अशी आहे की आपण नवे शोधत राहतो आणि हे माहीत होत जाते की ह्याच्याही पुढे काहीतरी आहे. हे पुढे जे आहे ते अध्यात्म वा ज्ञान.
जगात घडणाऱ्या ९९.९९ घटना ह्या आपल्या मर्जीनुसार होत नाहीत. त्यामुळे हे सर्व घडवणारा कोणीतरी आहे तो देव अशी श्रद्धा अनेकजणांची आहे. ह्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना एका माणसाने प्रश्न विचारला होता की तुम्ही देव बघितला आहे का? ते म्हणाले होय बघितला आहे. मग तो मनुष्य म्हणाला की आहे तर मला का दिसत नाही. महाराज म्हणाले की दिसेल जर तुमच्याकडे देवाला बघण्याचे डोळे असतील तर. असे डोळे मिळवण्यासाठी नामस्मरण आणि शुद्ध आचरण हे जरूरीचे आहे असे महाराजांनी सांगितले आहे.