जर आपण सर्व तंत्रज्ञानानेयुक्त होऊन एखाद्या आदिम परग्रही वस्तीवर गेलो तर ते तंत्रज्ञानाचे सगळे चमत्कार बघून ते आपल्याला देव मानायला लागतील. मग आपल्या दृष्टीने असणारा देवही थोड्याफार प्रमाणात असाच असावा.
E=m*c2 आणि सापेक्षतेचा सिद्धांत, नॅनो-कण, क्वांटम गतिकी इत्यादींच्या साहाय्याने आपण साध्या तर्काच्यापलीकडे जाऊन विचार करू शकत आहे.
१. वस्तुमान आणि ऊर्जा यांचा परस्पर संबंध आपण प्रायोगिक तत्त्वावर (अजूनही बाल्यावस्थेत आहे असं मानलं) पुरेश्या प्रमाणात वापरू शकलो नाहीय. देव म्हणजे ते, जे चटकन स्वतःला ऊर्जेत आणि वस्तुमानात (आणि वेगवेगळ्या प्रकारात - उदा. राम, कृष्ण, शंकर इ.) बदलवू शकतात. उदा. अचानक देव प्रकट होणे वा अदृश्य होणे.
२. प्रकाशाची गती स्थिर असते. पण गुरुत्व बलाचा प्रकाशकिरणांवरही परिणाम होतो. गुरुत्व बलामुळे अवकाशही बदलते. ( आकृती बघा) दुवा क्र. १ यामुळे प्रत्यक्ष अंतर आणि तार्किकतेने (किंवा क्लासिकल मेकॅनिक्सने) शोधलेले अंतर वेगवेगळे असेल. बहुमितीमध्ये असेही काही मार्ग असू शकतात, जिथे प्रकाश साध्या अंतरापेक्षा अधिक लौकर पोहचू शकतो. (उदा. सायकलच्या चाकावर वर्तुळाकार जाणाऱ्या (एक मितीय) मुंगीपेक्षा स्पोकवरून (द्विमिती) जाणारी मुंगी लौकर पोहचेल. ) असे मार्ग देवाला ठाऊक असावे.
३. तुम्ही जितक्या वेगाने जाल, तितकं तुमचं घड्याळ हळू चालेल. ब्रह्माचा एक दिवस म्हणजे पृथ्वीचे एक युग (चुभुदेघे). याचाच अर्थ ब्रम्हदेव पृथ्वीच्या तुलनेत अतिशय जास्त वेगाने जात असावेत.
अजूनही बरेच निष्कर्ष काढता येतील आणि म्हणता येईल की "देव म्हणजे अती-अती- अती-प्रगत मानव".