"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:
माझा जन्म पुण्याचा आहे आणि मी मुंबईत लहानाचा मोठा झालो. मला ठाऊक आहे, की मी हे इतक्या वेळा सांगितलंय, की 'माझा जन्म..' हे वाचल्यावर पुढचं वाक्य लिहायचीही गरज उरणार नाही मला. तरीही पुन्हा सांगतो, कारण ह्या माहितीची पुढच्या लेखाला तेव्हढीच गरज आहे, जेव्हढी मुक्तपीठ वरच्या प्रतिक्रिया एन्जॉय करण्यासाठी लेख वाचण्याची.