आणि स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करू शकणारा माणुस कायम (म्हणजे मनुष्य जात असे पर्यंत) राहीलच. अस्तित्वासाठी लढा, दुसर्यावर कुरघोडी, अधिकाधिक साधन सामुग्री जमा करण्यासाठी धडपड (आणि मारामारी) हे मनुष्याच्या (किंबहुना कोणत्याही जिवंत प्राण्याच्या) हाडीमासी असतेच, तो निसर्गच आहे. अन्यथा गौतम बुद्ध, महात्मा गांधी यांना जगात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले असते.
आपापला पंथ (राष्ट्र) बनवून तो पंथ टिकवण्याचा प्रयत्न करणे हेही नैसर्गिकच नव्हे का? एक एकटे किंवा पृथक कुटुंबांत राहण्या पेक्षा समाज (गट) करून राहण्याने आपल्या वंशाचे रक्षण करणे (सुरुवातिला इतर प्राण्यांपासून, नंतर इतर गटांपासून) सुकर होते. असे धर्म-पंथ निर्माण झाले नसते तर एवढे क्लीष्ट परस्परसंबंध असलेले समुह निर्माण झाले नसते . मनुष्यजात एवढी (म्हणजे लोकसंख्या हाच प्रश्न बनेपर्यंत) वाढली नसती.