संस्कृतचा सखोल अभ्यास करायचा असेल तर मराठीतून करता येत नाही, कारण
पुस्तके नाहीत. त्यासाठी जर्मन भाषा शिकून मगच प्रगत संस्कृत शिकता येते
याचा अर्थच हा की आम्हीच करंटे की हे ज्ञान आम्ही मराठीत आणू शकलो नाही पण जर्मनांनी ते काम केले. कोणी मॅक्समुलर की गटे(चुभुदेघे) कालिदासाचं शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला होता म्हणे. यात दोष कोणाचा ? आमचाच ना ? इतके वर्ष आम्ही संस्कृत भाषेसाठी पुस्तके बनवले नाहीत, पण जर्मनांनी ते केलेच ना ? त्यांना किती वर्ष लागले असेल ? मग आजच्या जगात ते अधिक सोपे होइल असे वाटते.