दिव्या, पंख्याविना वातानुकूलित हे असे जगणे..
चला अंधार साहू या, जरा निथळून पाहू या!!
किती उपकार मानावे, विजेचा थांग नसण्याचे?
नकोशा शासनालाही जरा 'निवळून' पाहू या!!
सुंदर बहर! कविता आवडली.
सुखाच्या सर्व व्याख्यांना जरा बदलून पाहू या
चला, केव्हांतरी आयुष्यही जवळून पाहू या!!
ही वैचारिक संकल्पनाच मला खूप भावली. महत्त्वाचे विचार प्रसवणारे लोकही गझल लिहीतात हे पाहून फार बरे वाटले.