मराठा इतिहासाची दैनंदिनी ... ! येथे हे वाचायला मिळाले:
अफझलखान वधाने हादरलेल्या आदिलशहाने दुप्पट मोठी फौज देऊन रुस्तुम-ए-जमा याला पुन्हा मराठ्यांवर हल्ला करायला धाडले. त्याच्या सोबत होता बापाच्या वधाचा सूड उगवायला आलेला अफझलखानाचा मुलगा फाझलखान. ह्या प्रचंड फौजेचा शिवरायांच्या नेतृत्वखाली पराभव करत मराठ्यांनी कोल्हापूर पावेतो मजल मारली आणि आदिलशाहीचा सर्वात बळकट असा 'पन्हाळगड' काबीज केला.