आधुनिक कर्ण येथे हे वाचायला मिळाले:
लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, ही लोकशाहीची व्याख्या. या लोकशाहीने लोकांच्या हातात मतदानाचा हक्क दिला आणि पुढे माहितीचा अधिकारही. मात्र मतदानाचा अधिकार बजावणारा विकत घेतला जातो आणि माहितीचा अधिकार वापरणारा एक तर सिस्टीमचा बळी ठरतो किंवा गुडांच्या हत्यारांचा. लोकशाहीच्या थोतांड गप्पा मारणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे बुरखे टराटरा फाडणारं लोकशाहीतलं हे वास्तव वारंवार समोर येतं राहिलंय. परंतु तरीही लोकशाहीच्या दारावर न्यायाची भीक मागणाऱ्यांची संख्या मात्र कधी कमी झाली नाही. न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्यांपैकीच एक म्हणजे ...