आल्हादक प्रतिबिंब! येथे हे वाचायला मिळाले:
अमावस्येच्या रात्रीचा गडद अंधार, लाल शेंदरी पहाट, आणि आता कोवळं ऊन झरोक्यातून आत येऊ लागलं. त्या ताज्यातवान्या उन्हानं खोली उजळून निघाली होती. कवडश्यात धूळ खेळत होती. मधूनच हवेच्या झुळकीने गडबडून जात होती. त्याचं कशातच लक्ष नव्हतं. त्याचे हात वेगाने त्याच्या कॅनव्हासवरून फिरत होते. वेगवेगळे रंग, वेगवेगळे ब्रशेस, काहीच नसेल तर हाताची बोटं सगळं वापरून होत होतं, तरीही अपूर्णच त्या चित्रावरून त्याची नजर हटत नव्हती. आख्खी बादलीभर रंग तयार करून तो बादलीभर रंग तयार करून तो बादलीभर रंग कॅनव्हासवर ओतून वॉश देण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. ...