माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:

ती चार चार मुलांची आई झाली तेव्हा केव्हढा आनंद झाला होता तिला. मला मालमत्ता-धन दौलत काही नको देवा. ही माझी सोन्या सारखी मुल म्हणजे माझी दौलत आहे. मी मोल मजुरी करीन आणि या माझ्या सोन्यांना मोठ करीन, खूप शिकवीन, मोठी झाली की ही सर्व माझी जीवापाड काळजी घेतील.

ती रात्रंदिवस मेहनत करून घर चालवायची. नवर्याचा फारसा काही उपयोग होत नव्हता. मुलांना वडील आवश्यक असतात म्हणूनच नाही तर. असो तिने जीवापाड आपल्या पिल्लांना जपल आणि मोठ केल. मुल हुशार होती. मोठा शाळेत कायम पहिला यायचा. ते पाहून दुसरा मग तिसरा आणि सर्वात छोटा तर त्यांच्यापेक्षा ही ...
पुढे वाचा. : म्हातारपण- एक शिक्षा?