कथा छान आहे. लेखनशैली देखील उत्तम. व्यक्तिगत असूयेपोटी किंवा अहंकारापोटी विनाकारण कधी कधी एखाद्याचा राग केला जातो. त्याला कदाचित आपला पूर्वग्रह किंवा भूतकाळातील वाईट/विचित्र अनुभव हे कारणही असू शकते. असा राग करणे हा मनुष्यस्वभाव आहे. पण हा राग अनावश्यक आहे, समोरचा माणूस आपण समजतो तितका काही वाईट नाही, ही जाणीव व्हायला थोडा अवधी जावा लागतो. स्वतःच्या वागण्याचा सारासार अभ्यास केला तर स्वतःला पडलेल्या अनेक गंभीर वाटणाऱ्या अशा प्रश्नांची उत्तरं ही वागण्यात बदल केल्यास सहजपणे मिळू शकतात. पण शांत डोक्यानं विचार केला पाहिजे असं म्हणणं आणि तसा विचार प्रत्यक्षात करणं यात चांगलाच फरक आहे हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. तुम्ही तसा विचार केलात आणि स्वतःला बदललंत ही फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या मते हेच या कथेतून शिकण्यासारखं आहे.
आपल्या पुढील लेखनाच्या प्रतीक्षेत. धन्यवाद. दिलसे.