आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
`मेमरीज ऑफ मर्डर`मध्ये `मेमरीज` या शब्दाला खास महत्त्व आहे, कारण या साऊथ कोरिअन चित्रपटातल्या घटना एका विशिष्ट काळाशी बांधलेल्या आहेत. इतर देशांचा इतिहास तोंडपाठ नसल्याने आपल्याला कदाचित हे चटकन लक्षात येणार नाही. आणि चित्रपटही आऊट ऑफ द वे जाऊन हा मुद्दा अधोरेखित करणार नाही. पण लक्षपूर्वक पाहणा-यांना दिसेल की, काही महत्त्वाच्या सामाजिक बदलांचा हा काळ आहे. कथानकातल्या घाडामोडी किंवा प्रमुख पात्रांच्या वागण्या-बोलण्यातले संदर्भ किंवा या सर्वांच्या एकत्र येण्यातून तयार होणारी पार्श्वभूमी यावर काळाचा परिणाम अप्रत्यक्ष होत असला, तरी तो लक्षात ...