आपण लिहिले आहे - कामगारांसारख्या संघटना करुनच यावर तोडगा निघू ष्केल. भारतात संघटना बनवणे आणि संप करणे, याशिवाय पर्याय नाही असच दिसतय.

माफ करा -  पण मुंबईतिल गिरणी कामगारांच्या संपाचा काय परिणाम झाला आणि कुणाला फायदा झाला हे आपल्याला माहित नाही असे वाटते. अन्यथा आपण हे कामगार संघटना, संप वगैरे विचार मांडताना विचार केला असता. आजकालच्या जमान्यात सचोटिने कामगारांच्या भल्यासाठी कुणी काही करेल असे तुम्हाला खरेच वाटते का? तथाकथीत 'कामगार नेते' कामगारांना कुठे नेउन 'पोहोचवतात' आणि स्वतः 'कुठे' जाउन पोहोचतात याचा जरा अभ्यास केला तर मी काय म्हणतोय ते समजेल. आजवरच्या कामगार लढ्याच्या ईतिहासाकडे बघितल्यास आणि सध्याच्या सर्वच्या सर्व कामगार संघटना या कोणत्यातरी राजकिय पक्षाशी संलग्न असतात आणि राजकिय पक्ष काय करतात हे आपणास चांगले माहित असेलच. हे लक्षात घेतल्यास समजेल कि कामगार संघटना हा एक 'धन्दा' आहे आणि संप हे कामगार संघटनेच्या हातातील दुधारी शस्त्र आहे - मालक - कामगार दोन्हीना त्यापासून ईजाच होउ शकते - मदत नाही!