या शीर्षकाचा आणि याच विषयावरचा हा लेख वाचला. आपल्या गरजा नक्की किती आहेत आणि त्यासाठी आपण किती वेळ राबायचं हे ज्याचं त्यानं ठरवलं पहिजे. उपभोगवादाचा हा पुढचा तार्किक टप्पा आहे. नुसत्या वस्तूंनी घर भरण्यासाठी आणि जाहिरातींतून डोक्यात भरवलेली 'लाईफ स्टाईल' मिळवण्यासाठी लोक स्वतःहूनच आटापिटा करतात. खरंच एवढ्या गोष्टींची गरज आहे का? आणि नोकरीतही प्रत्येकाने वरची पोस्ट मिळवणे आवश्यक आहे का? कुठेतरी थांबायला नको का?