लेख अतिशय आवडला. मराठीतून संगणकव्यवहार करण्यासाठी आवश्यक त्या जवळजवळ सर्व बाबींचा विचार लेखात केलेला आहे. मुद्दा एवढाच असतो की हे सर्व करून संगणकव्यवहार अधिक सोपे होतील की थोडेसे क्लिष्टच. फारच क्लिष्ट होणार असेल तर मराठीकरण करण्यापेक्षा इंग्रजी शिकलेले बरे.
एका इंग्रजी तांत्रिक शब्दाला एकच मराठी शब्द हवाच हा आग्रह नसावा; अर्थाच्या विविध छटा दाखवणारे वेगवेगळे शब्द असावेत; इतकेच काय पण, एकच छटा असलेले एकापेक्षा अधिक मराठी शब्द असले तरी चालतील, जे लोकमान्य होतील ते टिकतील. हे विचार मी यापूर्वी अनेकदा मांडले होते.
तसेच सर्वच इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द बनवण्यापेक्षा जे शब्द मराठी किंवा अन्य भारतीय भाषांमध्ये मुळातच आहेत, त्यांना कोणते इंग्रजी शब्द समर्पक ठरतील असा विचार करावा, हे माझे मत मी मनोगतच्या काही सदस्यांना व्य. नि. ने कळवले होते. असल्या शब्दांची काही उदाहरणेही मी त्यावेळी दिली होती.
काम कठीण असले तरीपण संगणकव्यवहाराचे मराठीकरण करून पहायला काहीच हरकत नाही. असा प्रयत्न स्तुत्यच असेल.