१. भाषांतर करण्यासाठी मूळ लेखकाची परवानगी लागते का ?

मूळ लेखनाचे हक्क ज्यांच्याकडे आहेत त्यांची परवानगी भाषांतर प्रसिद्ध करण्यासाठी लागते.

२. जर लागत असेल तर ती परवानगी, लेख लिहिण्यापूर्वी घेतात की नंतर ?

प्रसिद्ध करण्यापूर्वी घ्यावी लागते.

३. भाषांतरित पुस्तकाचे हक्क कोणाकडे असतात ? मूळ प्रकाशक की नवीन की अजून कोणी ?

ते मूळ लेखनाचे हक्क ज्यांच्याकडे आहेत, त्यांच्या मर्जीनुसार ठरते.

४. भाषांतरित पुस्तकाची /लेखाची रॉयल्टीत मूळ लेखकाचा हिस्सा असतो का ?

मागितला जाऊ शकतो.

५. जर भाषांतरित लेख जालावर आणि मोफत उपलब्ध करून देणार असेल, तर त्यासाठी काही वेगळी गरज असते का ?

हक्क मागताना तसे सांगावे लागते.

६. पुस्तक लिहिल्यानंतर प्रकाशनासाठी संपर्क कसा करावा ? इमेलने पुस्तक (पूर्ण) पाठवून की एखादा भाग पाठवून ?

ते सांगतील त्याप्रमाणे ठरते.

७. इतर काही बाबी ज्या लक्षात ठेवाव्या अश्या.

धंदेवाईक, नफ्यासाठी भाषांतर नसल्यास हक्क मागताना तसा उल्लेख करावा.