लेख वाचले. फालतू वाटले. पन्नास वर्षांपूर्वीच्या बीटल्सच्या गाण्यामध्येही आय हॅव बीन वर्किंग लाईक अ डॉग वगैरे ओळी आहेत. आयटी कंपन्यांमध्ये फारशी पिळवणूक वगैरे होत नाही. कोणत्याही गंभीर स्वरुपाचे प्रोफेशनल हॅजार्ड्स नसणारी, प्रदूषणमुक्त वातावरणात काम करायला मिळणारी ही नोकरी आहे. लोक पैशासाठी खाणींमध्ये कामे करतात. शिपिंग कंपन्यांच्या जहाजावर कुटुंबापासून दूर सहासहा महिने राबतात, देशाचे सैनिक रात्रंदिवस जिवाची भीती बाळगून नोकरी करतात त्या स्वरुपाचा जिवाचा धोका या नोकरीत नाही.
प्रामाणिकपणे भरपूर कष्ट करण्याची मानसिक तयारी असेल तर आयटी क्षेत्रात पिळवणूक वगैरे जाणवणार नाही असे वाटते. आणि हे तत्त्व आयटीपुरतेच मर्यादित नाही.