जर तुम्ही प्रथितयश इंग्रजी लेखकाच्या पुस्तकाचे भाषांतर करणार असाल तर आधी तुमचे मराठी भाषांतर छापण्यास तयार असलेल्या प्रकाशकाला गाठावे. तुम्ही ह्यापूर्वी कधीच भाषांतर केले नसेल तर प्रकाशक मिळवणे कठीण जाऊ शकते. अशावेळी आधी भाषांतर करून ते प्रकाशकाकडे नेणे आणि त्यांनी ते वाचल्यावर त्यांची प्रकाशित करण्याची तयारी आहे का हे पाहणे असे करता येऊ शकते. छापण्याची तयारी दाखविणारा प्रकाशक मिळाला तर त्या प्रकाशकानेच पुस्तकाच्या मूळ प्रकाशनाकडून भाषांतराची परवानगी मिळवायची असते. मग रॉयल्टी हक्क वगैरेंची काळजी हे प्रकाशकच करतात. पुस्तकाचे भाषांतर करताना परवानगीची मागणी भाषांतर करणाऱ्याने नव्हे तर ते भाषांतर छापणाऱ्या प्रकाशकाने करायची असते.