जरी सत्य तू बोलतो मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता?
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे?
येथे मान्य आहे आणि मान्यता कुठे आहे असे दोन्ही एकाच ओळीत आल्याने गोंधळ उडू शकतो. तो टाळण्यासाठी
तुझे बोलणे सत्य आहे कदाचित, परी त्यास आहे कुठे मान्यता?
किंवा
तुझे बोलणे सत्य असले तरीही जगी त्यास आहे कुठे मान्यता?
किंवा
तुझे बोलणे सत्य आहे कळे रे, परी त्यास आहे कुठे मान्यता?
असा काही बदल सुचवावासा वाटतो.
शिवाय असे केल्याने 'तू बोलतो' ह्यातला व्याकरणदोषही निघून जाईल, हा वाढीव फायदा.