जगत फुकट काहीच मिळत नाही. जगण्यासाठी पैसे हे कमवावेच लागणार / लागतात.

भीक मागायची तरी सुद्धा पूर्ण दिवस भटकावे तरी लागते किंवा एका जाग्यावर वाट बघत बसावे लगते. दे रे हरी खाटल्यावरी असे नाही होऊ शकत.

पिळवणूक वगैरे काही नाही. इथे कोणी परोपकार करायला कंपनी सुरू करत नसते. व्यवसाय हा फायदा मिळवण्यासाठीच केला जातो. तुम्ही कंपनीकडे काम मागायला जाता. आणि कामावर रूजू होतानाच सगळे ठरते... दोघांच्या संमतीने ... तेव्हा नंतर असे रडण्यात अर्थ नाही.

पेलण्यापलीकडे काम वगेरे सुद्धा काही नाही. आधीच प्रमाणापेक्षा जास्ती पैसा आय. टी. मध्ये मिळतो (इतर क्षेत्रांपेक्षा). जेवढे पैसे कंपनी देते तेवढे काम करून घेते. बाकी काही नाही. तुम्हाला जमणार नसेल तर बाजूला व्हा... पर्याय खूप आहेत.

जास्त पगार मिळतो त्याबद्दल काही बोलत नाही कोणीच. पण काम वाढले की लगेच ओरड सुरू.

स्वतःची कुवत ओळखून जगात वावरावे. किती मिळवायचे आणि कुठे थांबायचे हे ज्याचे त्याने ठरवावे ... म्हणजे असे रडावे लगणार नाही.

-- सचिन