वाचून आश्चर्य वाटले. ज्या ठिकाणी जायला फक्त बारा रुपये लागतात, तिथे ऐर्शी रुपये द्यावे
लागले तरी ही आपण रिक्षावाल्याचा चांगुलपणा शोधलात , धन्य आहे तुमची . सकाळच्या वेळी रिक्षावाल्याने जास्त पैसे सांगणं हे मुळातच
चुकीचं आहे. रात्रीची वेळ असती तर समजू शकतो. पण त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची यंत्रणा अगदीच कुचकामी आहे. म्हणून हे घडतं.
तशीच आपली अत्यंतिक गरज हेच त्यांच्या धंद्याचे भांडवल आहे. असो , अनुभव लिहिलात हे बरं झालं. रिक्षावाल्यांना जबान दिली , वगैरेचे
काहीही महत्त्व नसतं. म्हणूनच भाडी वाढवून दिली तरी त्यांच्यात सुधारणा होणं शक्य नाही. असो. पण रिक्षावाल्याला कुठेतरी लाज वाटली
हेही नसे थोडके. पु̮ ले. शू.