मुळांत हा एक चुटका आहे. याला लघुकथेची लांबी नाहींच. साहित्याचें सदरही विरंगुळा मौजमजा असेंच आहे.

आणि ही कथा माझ्या माहितीनुसार 'सर्वोत्कृष्ट मराठी विनोदी कथा' नावाने जे १५ खंड प्रसिद्ध झाले (प्रकाशन आठवत नाही) त्यात मान्यवर लेखक-संपादकांनी निवड करून समाविष्ट केलेली आहे.

एखादें बक्षीस मिळणें हा कांहीं दर्जाचा मानदंड ठरूं शकत नाहीं. मतोगतावरील साहित्य कोणीही सुसंस्कृत व्यक्ती आपल्या कुटुंबातील आबालवृद्धांना दाखवूं शकूं या दर्जाचें असावें असें माझें वैयक्तिक मत आहे. अजून तरी मनोगतानें हा दर्जा टिकवलेला आहे. या निकषाला वरील लेखन उतरत नाहीं.

सुधीर कांदळकर