एखादा भाग वाचकांना आवडला नाहीं म्हणून नाउमेद होऊं नये. इथें प्रतिसादांची संख्या हा मीं लेखनाच्या लोकप्रियतेचा एक निकष मानला आहे. जो चुकीचा देखील असूं शकतो. शंभरेक वर्षांपूर्वींची कविता आजच्या रसिकांना आवडण्याची तशी शक्यता कमीच. कधीं कधीं कविताविषय न आवडल्यामुळेंही कविता रसिकांना आवडत नाहीं. मला व्यक्तिशः कोवळी स्मिताची कळी ही एकच कविता आवडली. तरी आपण म्हटल्याप्रमाणें कवितेंत नाद जाणवतो आहे. बहुतेक कवितांतील वापरलेल्या व्यंजनांचें उच्चारसौंदर्य छान आहे.
केशवसुतांनी स्वतःलाच 'नापसंत' वाटणाऱया सुरुवातीच्या काळातील कवितांचा होम केला
हें प्रथमच कळलें केशवसुतांच्या अभिरुचीला सलाम.
पुढील भाग नव्या जोमानें, नव्या उभारीनें येऊं द्यात. आपण घेत असलेली मेहनत स्पष्ट दिसते आहेच. शुभेच्छा.
सुधीर कांदळकर