कामांत ढवळाढवळ करणें, लायकीपेक्षां कमी दर्जाचें काम देणें, पारंगततेपेक्षां वेगळ्या विषयांतील काम देणें, गैरसोयीचे कामाचे तास देणें, अपमानास्पद शब्द वापरणें इ. प्रकार आहेत. पण कामगार खमक्या असेल, कामांत चोख आणि पारंगत असेल तर अगदीं बॉसला पण कायद्याच्या चौकटींत राहून , अनपेक्षित धक्के आणि मनस्ताप देऊन, देहबोलीनें तसेंच नको त्या गोष्टी करून मानसिकदृष्ट्या पिळतां येतें. फक्त आपलें डोकें ठिकाणावर पाहिजे. मुंबईकर या कलेंत हुशार आहेत. एक किस्सा सांगतो. एका सर्व्हिस इंजिनीयरला दिल्लीला ग्राहक कारखान्यांत दुसरे दिवशीं जाण्यास सांगितलें. विमानाचें तिकीटही दिलें. हा बेटा मुद्दाम नंतरच्या फ्लाईटनें गेला. त्याला घ्यायला खाजगी टॅक्सीचा त्याच्या नांवाचा बोर्ड घेतलेला माणूस  विमानतळावर हजर होता. त्याला टाळून हा महाशय दुसऱ्या टॅक्सीनें परस्पर कारखान्यांत गेला. पोहोंचल्याचा निरोपही त्यांच्या कार्यालयांत दिला नाहीं. हा पोहोंचला नाहीं या समजुतीनें ग्राहक कंपनीच्या कार्यालयानें आमच्या बॉसची भरपूर खरडपट्टी काढली. पण यानें आपलें काम चोख केलें. वर ग्राहक कंपनीच्य स्मन्वयावर खापर फोडलें.

आपल्याकडील भारतीय कायदे बहुराष्ट्रीय कंपन्यांना नको आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावानें कामगार कायदा १९४८ मधून आय टी नोकरदारांना वगळलें आहे. पण अमेरिकन आय टी कामगारांना मात्र काम नाहीं म्हणून कमी करतांना मात्र सहा महिन्यांचा पगार दिला जातो. ते तो पगार घेतात. त्या पैशांतून एक गाडी विकत घेतात, दोनेक महिने पर्यटन करतात. आणि लगेच दुसरी नोकरी शोधतात.

असो कामगार कायद्याचें संरक्षणही फसवेंच असतें. उद्योजकांची मानसिकता वाईट आहे हें खरें. गिरण्या या उद्योजकांचा आडमुठेपणानें बंद झाल्या. कामगार नेत्यांच्या नव्हे. 'सोनी' कंपनीच्या संस्थापकानें 'मेड इन जपान' हें पुस्तक लिहिलें आहे. आपल्याकडून एखादा कर्मचारी सोडून गेला तर तेथील उद्योजकांना लाज वाटते.

प्रश्न आहेत हो हा कीं आपल्याकडील काय वा पाश्चात्यांकडील काय, उद्योजकांची मानसिकता सुधारणार कधीं?

सुधीर कांदळकर