निवृत्तीचे वय जवळ येत चालले की निवृत्ती जास्त करून हवीशी वाटते की नकोशी वाटते?
ह्या प्रश्नाचं उत्तर सामान्यीकरण करून देता येणार नाही. एकसुरीपणाचा कंटाळा आणि थोडे स्वातंत्र्य हवेसे वाटणे यामुळे मी निवृत्तीची वाट पाहत होते. घरकामात न रमणाऱ्या (माझ्यासारख्या) महिलांना निवृत्तीपेक्षा नोकरीत बदल हवासा वाटत असावा.