सारेगमप लिटील चॅम्प पुन्हा सुरू झाले. खूपच छान कार्यक्रम आहे हा.

हे नक्की की ज्युनिअर आणि सिनिअर यामध्ये असा भेदभाव करू नये. कितीही अवघड असेल तरी २ स्पर्धक बाद होतील हा नियम ठरला की दोन स्पर्धक बाद करायलाच हवे. झी निर्णय देताना सर्वांना न्याय मिळायला हवा हा प्रयत्न करतात. पण त्यामुळे प्रेक्षकांचे गैरसमज होतात.आणि कोणावर तरी नकळतपणे अन्याय होतोच. त्यापेक्षा नियमाप्रमाणे जाताना ज्याला कमी मार्क तो बाद होऊ द्यावा. म्हणून ऐनवेळी कोणताही नवीन निर्णय घेवू नये. जे ठरले असेल तसेच करावे हे बरे.

आता एक शंका विचारते,

पण यावेळीच्या निवडींमध्ये मागच्या पर्वातले चॅम्प्स परत कसे निवडले गेले? प्रोमोजमध्ये तर त्यांचा उल्लेखही नव्हता. आणि अचानक ते पडद्यावर दिसले. आणि त्यांच्याशी बोलताना पल्लवी जोशीचा सूर कुठेही जुन्या ओळखीचा नव्हता. असे का? या पर्वात जुने स्पर्धक सामील होऊ शकतात याबद्दल काही खुलासा झीने आधी केला होता का? मी हा चॅनेल युट्युबवर बघते त्यामुळे सगळी माहिती नाही. तरी कोणाला माहिती असेल तर कृपया खुलासा करावा.