सर्वप्रथम या संस्थळावर कोणता मजकूर यावा आणि त्याचा दर्जा काय असावा, हे ठरवण्याचा आणि त्या अनुषंगाने निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार प्रशासकांचा आहे, हे उद्धृत करुनच पुढे जाऊया.
माझे वैयक्तिक मत असे आहे, की यदाकदाचित मनोगतावरील मजकूर लिहिणारे आणि वाचणाऱ्यांचे विश्लेषण केल्यास त्यात बाल कुणी असेल, असे वाटत नाही. इथल्या लेखनात मी तरी कधी बालसाहित्य, संस्कारकथा, किलबिलगाणी असे वाचलेले नाही. म्हणजे वाचकवर्ग जर किमान १८ वर्षांपुढील किंवा सज्ञान असेल तर त्याला या विनोदाने धक्का बसण्याचे काहीच कारण नसावे. उलट शाळकरी मुले आजकाल जे विनोद सांगतात ते पाहाता तर हा विनोद खूपच मचूळ ठरेल.