'उद्योजकांची मानसिकता वाईट आहे. गिरण्या या उद्योजकांच्या आडमुठेपणाने बंद झाल्या, कामगार नेत्यांच्या नव्हे' या विधानांचा अधिक संदर्भ मिळेल का? 

जपानमध्ये आपल्याकडून कर्मचारी सोडून गेला, की उद्योजकांना जशी लाज वाटते तशीच लाज कामगारांना संपाचे हत्यार उपसण्याची वाटते. निषेध नोंदवायचा असेल तर दंडाला काळी फीत बांधली तरी पुरते. व्यवस्थापनाची तत्क्षणी धावपळ सुरू होते. जपानमधीलच एक किस्सा वाचनात आला होता. एका बुटांच्या कारखान्यात व्यवस्थापन कामगारांच्या मागण्या विचारात घेत नव्हते तेव्हा त्यांनी एक अभिनव मार्ग अवलंबला. आंदोलनाच्या काळात त्यांनी कामावर जाऊन केवळ उजव्या पायाचे बूट बनवायला सुरवात केली. दोन दिवसांत व्यवस्थापन शहाणे झाले. नंतर त्याच कामगारांनी मागण्या मान्य झाल्यावर जादा काम करून डाव्या पायांचे बूटही बनवले, ही गोष्ट पण नमूद करायला हवी.