पु. ल. देशपांडे यांनी जसं 'महाराष्ट्र सारस्वता'चं विडंबन म्हणून 'गाळीव इतिहास' लिहिला तसा हा एक ग्रंथही त्यांच्या हाती लागायला पाहिजे होता असं वाटलं.. ह̱. घ्या. (यापुढे आम्ही हा विषय गंभीरपणे घेऊ.)

'आपल्या धर्मातील चालिरीतींच्या बाबतीत...' : म्हणजे दुसऱ्या धर्मातील चालीरीतींबददल चालेल का हो?  (अरेरे ... पुन्हा कोटी करायची सवय आड आली. कृपया क्षमस्व.)

आता गंभीरपणे - मला वाटतं प्रत्येक धर्मातल्या अनेक रूढ गोष्टींमागे काही वैज्ञानिक आणि काही भावनिक कारणं आहेत. अर्थात, त्या कारणांमुळे समजून (किंवा कारणं न समजताही) किंवा खरं तर आपल्याला एक शिस्त लावून घेता येते की नाही / मनावर ताबा ठेवता येतो की नाही हे तपासण्यासाठी आणि कधी कधी गंमत म्हणूनही अशा गोष्टींचं पालन करणं माणसाकडून घडू शकतं. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.