मराठीत चांगले चित्रपट बनत नाही, म्हणून ते बघायचेच नाही, असं म्हणून कसं जमेल ? मला तरी वाटते की नेहमी हिंदी (अगदी बकवास असले तरी) चित्रपट बघणाऱ्यांना मराठी चित्रपटांची नावे तरी माहिती असतिल का? बरेचदा मलाच माहिती नसते.
आणि चालत नाही म्हणून लावणार नाही आणि लावणारच नाही तर चालणार कसे, लोक येणार कसे ? या दुष्टचक्रातून बाहेर कसे पडता येईल ?
मिठुनचे चित्रपट बघणारे अजुनही आहेत आता याला काय म्हणावे ? त्यापेक्षा भरत आणि मकरंदचे वाईट्ट चित्रपटही बरे नाही का ? म्हणजे आम्ही मराठी चित्रपट बघणारच नाही, असं का असावं? हिंदीच्या प्रभावाखाली आपण अजुनही आहोत, असं वाटतं. "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय... " हा चित्रपटही हिंदीसारखाच टाळ्या पडणाऱ्या संवादावर चालला असेल किंवा मराठीच्या मोहिमेमुळे, माहिती नाही.
आणि मराठी चित्रपटाकडून प्रेक्षकाला काय अपेक्षा आहेत, हे अजून निर्माते/ दिग्दर्शक वा लेखक समजू शकले नाही असेल म्हणावे लागेल का ?