आपल्या मुद्द्यांना क्रमवार उत्तरे -
१. काय राव तुम्ही, चला... आता आम्ही पण गंभीरपणेच घेउ...
२. 'आपल्या धर्मातील चालिरीतींच्या बाबतीत... ' बाबत - मला म्हणायचे होते कि 'आपणच' आपल्या धर्मातील चाली... वगैरे. म्हणजे जेव्हा कुणी दुसर्या धर्मातील मोठा चित्रकार आप्ल्या धर्मातील देवी देवतांची घाणेरडी चित्रे खाढतो, तेव्हा त्या चित्रकाराचे ते कृत्य आपल्याला खटकते आणि सगळे त्यावर झोड उठवतात (उठवलीच पाहिजे - काही दुमत नाही - कृपया नोंद घ्यावी). पण जेव्हा 'आपणच' आपल्या धार्मिक गोष्टींच्या बाबत थट्टा सुरू करतो (त्यातही जाहिरपणे) तेव्हा खेद होतो. सबब, दुसऱ्या धर्मांच्या बाबतीत आपण आदर बाळगला (निदान अनादर जाहीरपणे व्यक्त करण्याचे टाळले) तर आपल्या धर्माच्या बाबतीत समान वागणुक मिळन्याची अपेक्षा बाळगता येईल. असो, फार विषयांतर झाले... मुळ चर्चा कुठून सुरू झाली आणि कुठे चालली... कदाचीत मुळ प्रश्नकर्त्याला हेच अपेक्षीत असावे...!
३. .......वैज्ञानिक आणि काही भावनिक कारणं आहेत अददी बरोबर आहे. म्हणुनच बरेच वेळा वाटते, सरळ सांगून लहान मुलं ऐकणार नाहित म्हणून असे बागुलबुवा तयार करायचे असं कधी कधी वाटतं. आणि मग तर्कवितर्क सुरू होताल.... शेवटी आपण म्हणता तसे - ज्याचा त्याचा प्रश्न आहे...