मी हा कार्यक्रम अगदी सुरवातीस बघत असे परंतु एका महागायकाने व समर्थकांनी गोंधळ घातल्यानंतर त्याला परत बोलविण्यात आले व महागायक जाहीर करण्यात आले. तसेच दर्शकांची मते मागवतात पण आकडेवारी जाहीर करत नाहीत. हे म्हणजे निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करणो पण मतांचे आकडे जाहीर न करणे असे झाले.  तसेच एखादा गायक चांगला की कसे हे तज्ञांनी ठरवायचे की केवळ गाणी ऐकणाऱ्यांनी ?  बरे मराठी गाणी, त्यातला आशय मराठी माणसास कळेल की अमराठी माणसास ?  मुळात मराठी कार्यक्रमात अमराठी परीक्षक कशाला.  त्यामुळे मी हा कार्यक्रम - खरे तर झी मराठी ही वाहिनी - बघत नाही.   सध्या सारा समाज प्रवाहपतित आहे नुसता वाहत चालला आहे केवळ पैसे कमावणे हेच उद्दिष्ट असलेल्या वाहिन्यांच्या मागे, म्हणून तर अशा कार्यक्रमांची चलती. झी वरील मराठी मालिका की क्राइम सीरियल ?  सर्व मालिकांतून गुन्हेगारी, गळे कापणे, माना चिरणे, जिभा जाग्यावर न ठेवणे, उडवणे असली भाषा याशिवाय काय असते कोणी सांगू शकेल ? असो सध्या पोलीस आणि गुन्हेगार ह्या भूमिका करू शकणाऱ्यांना झी वर कामच काम.