लेखा मध्ये जे विचार मांडले आहेत त्याबद्दल -

१. जी उदा. दिली (नेहा, गीता प्रतिकात्मक) त्याबद्दल : त्यांनी आधिच मान्य केले की नेहमीच्या ८ तासापेक्षा ते किमान १ - १.५ तास जास्त काम रोज करतात.

>> म्हणजे साधारण ९-९.५ तास त्या तसेही करतच आहेत. आता कंपनीने ऑफिशीअल वेळ  ९ तासाची केली तर यांना तसा काय फरक पडणार आहे. ते आताही ९ तासानंतर कामावरून घरी जाऊ शकत आहेतच. की आपली सवयच झाली आहे की रेंगाळत काम करायचे. म्हणजे कंपनी चे कामाचे तास ९ झाले की आपण १०-१०.५ तास काम करणार का... असे असेल तर चूक कोणाची ...  

आणि माझ्या माहिती नुसार कामाच्या वेळेतील बदल हा तात्पुरता होता. आर्थिक संकट आहे तोपर्यंत. 

२. आता ८ तास कामाविषयी - खरेच किती लोक पूर्ण ८ तास कामच करत असतात?

नक्कीच काही वेळ ऑनलाईन पेपर वाचणे, इतर फॉरवर्ड मेल (कामाव्यतिरीक्त) बघणे, चहा - कॉफी ब्रेक (किमान २-३ वेळा) + लंच ब्रेक (हक्काचा ऑफीशीअल) , मध्येच गप्पा रंगणे,  सिगारेट ओढणे (हे सर्वच आय टी कंपनीच्या बाहेर दिसणारे चित्र आहे).  

यासारख्या गोष्टीत वेळ जातोच. तो कधीच मोजला जात नाही.

काही लोकांचा अपवाद वगळता बहुतांशी कंपनी मध्ये हे चित्र दिसते. नेमून दिलेल्या ८ तासांचा पूर्ण उपयोग खरच आपण कंपनी च्या कामासाठीच करतो का ? ह्याचा विचार होणे ही गरजेचे आहे.

३. इतर क्षेत्रात ६ दिवस काम असते... आय टी मध्ये ते ५ दिवस.  शनी/रवीवार २ दिवस सुट्टी.

आपल्याला काम वेळेत पूर्ण करता येत असेल तर मग आपण नक्कीच या गोष्टींचा फायदा घेवू शकतो. असे वाटते.

५. शारिरीक/मानसिक पिळवणूक/त्रास : ती कुठे नसते ? पदोपदी त्याचा प्रत्यय सगळ्यांना येतो. अगदी स्वतःच्या घरापासून सुरूवात करता येईल. नवरा बायको नाते , मुले - आईवडील नाते , रस्त्यावरून जाताना आजूबाजूचे लोक इ. इ. प्रत्येक ठिकाणी हे आहेच. 

शेवटी प्रत्येक ठिकाणी/वेळी आपल्याच मनासारखे होईल असे नाही. टीम मध्ये काम करायचे तर ऍडजेस्टमेंट करावीच लागते.

६. एका प्रतीसादात सुधीर म्हणाले : "लायकीपेक्षां कमी दर्जाचें काम देणें"

मला वाटते की "काम हे काम असते" त्याला दर्जा आपण देतो. प्रत्येक काम आपल्याला काही नवीन गोष्ट शिकायची संधी देते. ते काम उत्तम रितीने करून दाखवले तर लोकांसमोर आदर्श निर्माण होतो. शिवाय आपले काम बघून नवीन काम / मोठी जबाबदारी (ज्याला प्रमोशन म्हणतो) हे सुद्धा मिळतेच.

७. कामाच्या अतिरेकाने नाते संबंधावर परिणाम -  सहजिकच आहे. नाते संबंधाला पुरेसा वेळ दिला गेलाच पाहीजे. पण तो कसा द्यायचा हे सुद्धा आपणच ठरवले पाहिजे. जर नवीन लग्न झाले आहे आणि काम-संसार सांभाळणे अवघड होत असेल तर काही दिवस जॉब न करण्याचा निर्णय घेता येवू शकतो. पण आपणच आपल्या गरजा वाढवलेल्या असल्याने असे निर्णय घेणे अवघड जाते. आणि मग सगळ्यांची परवड होते, स्वतःची ओढाताण होते.

आपल्याला पैसेही हवेत. कामाचे तासही कमी हवेत. त्यात कोणत्याही प्रकारचा त्रास/ ताणही होता कामा नये. मालकाने सगळे सांभाळून / समजून घेतले पाहीजे... म्हणजे आपण फक्त आपलाच विचार तर करत नाही ना?

उद्योजकाच्या बाजूनेही आपण कधी विचार करून बघीतला का?

- तो त्याची सर्व कमाई त्या उद्योगात लावतो. किंवा मोठी कर्ज काढून तो गुंतवनुक करतो. त्यालाही क्लायंटस मिळवताना कित्येक गोष्टींना सामोरे जावे लागते. काम मिळवण्यासाठी त्यांना किती माणसिक ताण सहन करावा लागत असणार. कंपनीचा तो सर्वेसर्वा असल्याने, कामाचे तास संपल्यावरही त्याच्या डोक्यात कंपनीचा विचार असतोच. कामगारांचाही विचार असतोच की.

शिवाय कामगाराला वाटेल तेव्हा तो जॉब बदलऊन निघून जातो/जाऊ शाकतो, त्यावेळी त्याच्यावर अवलंबून असलेले काम कसे पूर्ण करायचे याची चिंता मालकालाच करावी लागते.

अशा अनेक गोष्टींचा विचार आपण कधीच करत नाही.

शिवाय आपल्याकडे म्हटलेच आहे "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण" ... "Or High Risk High Gain"  

(मोठेपण = मोठ्ठा पगार/ प्रमोशन / गाडी / बंगला / सुखवस्तू

रिस्क = ताण/त्रास/पिळवणूक सगळेच आले.)

"कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है ।"

एकांगी विचार होऊ नयेत असे वाटते...

मी सुद्धा आय टी कामगारच आहे.... उद्योजक नाही. तेव्हा गैरसमज नको :)

--सचिन