लेखाचं शीर्षक फार आवडलं.

सहमत. निवृत्ती, सोपान मुक्ता ह्या नावांचा उपयोग शीर्षकात अतिशय सुंदर झालेला आहे. एक मनात आले ते असे : निवृत्ती , ज्ञानदेव, सोपान, मुक्ता ही नावे विट्ठलपंतांनी अतिशय कल्पकतेने ठेवलेली वाटतात. त्या काळात देवादिकांची नावे ठेवण्याचाच परिपाठ असणार (असे वाटते).  भारतीय तत्त्वज्ञानात निवृत्ती-ज्ञान-सोपान-मुक्ता असा काही क्रम सांगितलेला आहे की काय असे वाटते. त्या काळात अशा भाववाचक नावांची त्यांनी केलेली योजना आधुनिकच म्हणावीशी वाटते.