मी त्याच दिवशी मनोगतवर लेख टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण तांत्रिक अडचणीमुळे टाकू शकलो नाही.
मी जेव्हा काही मजकूर मनोगत वर डकवतो, तेव्हा तो दिसतच नाही. इतर स्थळांवर ही अडचण नाही. म्हणून मी इथे लेख टकू शकलो नव्हतो. पण आता मला ह्याचा उपाय कळला आहे. खिडकीत डकवले, की काहीच दिसत नाही ( सगळी पांढरी अक्षरे असावी असे दिसते.) मग त्या खिडकीत कुठेही टिचकी मारून ओढले की तो मजकूर दिसायला लागतो.
असो. आता काही अडचण नाही.
पण दुसरी एक अडचण ह्या खिडकीत येते. लिहीलेल्या मजकूरात दुरुस्ती करायला, सहसा आपण मूळ शब्दाला हायलाईट केले अन तिथे टंकले, की मूळ शब्दाचे जागी दुरूस्त केलेला शब्द दिसतो, असा खिडकी टंकनाचा रिवाज असतो. मनोगतावर मात्र, हायलाईट केलेल्या जागी नवीन शब्द न उमटता, नेहमीच तो नवीन शब्द मजकुराच्या सुरवातीचा शब्द बनतो. हे विचित्रच आहे. ह्यावर उपाय म्हणजे बॅक स्पेस करून मग टंकणे.