मऊमाऊ, वरदा, महेश,

तुम्हाला शीर्षक आवडलं हे वाचून मला फार फार बरं वाटलं. धन्यवाद.
खरं म्हणजे शीर्षक आधी सुचलं. त्याचं असं झालं की डोक्यात काही तरी विचार चालू असताना ’निवृत्ती सोपान’ हे दोन शब्द एकत्र आले आणि त्यातली गंमत लक्षात आल्यावर वाटलं की ही गंमत इतरांना पण अनुभवायला मिळावी.  त्यासाठी ह्या लेखाचा प्रपंच! गंमत वाढवण्यासाठी मुक्ताबाई पण आल्या. ज्ञानाचा आणि माझा दूरचाच संबंध असल्याने त्याला मात्र इथे कुठे जागा मिळाली नाही!

-मीरा