मला चर्चा आपण भरकटवत आहात असे म्हणायचे नव्हतेच. 'कदाचीत' आणि 'अपेक्षीत' असे लिहिले आहे.असो, सरळ सरळ क्षमस्व म्हणावे हेच बरे.

परिच्छेद -

अमक्या दिवशी नखे कापू नयेत, तमक्या दिवशी केस कापू नयेत, श्रावणात दाढी करू नये वगैरे चाली रिती म्हणजे भ्रामक कल्पनांचा परिपाक आहे. या मागे निव्वळ वर्णभेदातून आलेला अतिरेक आहे, शास्त्रीय कारण काहिही नाही. श्रावणात व्रतवैकल्ये पुजाअर्चा करण्याचे दिवस असल्याने तथाकथीत अमुक एका समाजाच्या माणसाला आपल्या अंगाला हातही लावू न देण्यामागे दुसरे तिसरे काहिही पटण्यायोग्य कारण असुच शकत नाही. समाजाला आपण जे करतो तेच योग्य आहे हे पटवून देण्यासाठी पुर्वी सवर्ण लोकांनि सर्व चालीरितींना  धार्मिक डुब देउन अवडंबर रचले आणि अनुकरण करणाऱ्या लोकांनि ते माजवले.....

असो, हा ग्रंथ मला जुन्या पुस्तकांच्या स्टॉलवर फाटक्या अवथेत मिळाला. तसेच घरचा राजवैद्य नावाचे पुस्तकही मिळाले. दोन्हिही पुस्तकांची काही पाने गायब, मुखप्रुष्ठ गायब अशी अवस्था आहे. पण तुकड्या तुकड्यांमध्ये बरीच उपयोगी आणि रंजक माहिती आहे.... असो..