भयंकर हा शब्द सामान्यतः भीती व्यक्त करायला वापरतात. पण हल्ली ह्या विशेषणाचे भलतेच उपयोग होत आहेत. म्हणजे अमक्याच्या लग्नात भयंकर सुंदर जेवण होते (इथे सुंदर जेवण ही जोडीही विचित्रच आहे. जेवण चविष्ट वगैरे असते. सुंदर म्हणजे दिसण्याचे विशेषण असावे असा माझा समज असो).
अमुक मुलगी भयंकर सुंदर आहे.
मला लता मंगेशकर भयंकर आवडते.
अमक्याने भयंकर सुंदर घर बांधले आहे.
इंग्रजीतील टेरिबल हा शब्दही वरील "भयंकर" प्रकारचा म्हणता येईल का?