हात दे हातात आता
चालुया ही वाट आता
हातात आणि वाट चालणार नाही.
त्याच स्वप्नांची नव्याने
घालुया रुजवात आता!
संपवू कोठे कथा?
को | ठे करू सुरवात आता?
वरच्या ओळी शेवटी एक गुरू कमी आहे. आणि तो खालच्या ओळीत (को) गेला आहे.
ही मिठी सोडू नको..
सर | ली जरी बरसात आता!
वरच्या ओळी शेवटी एक गुरू कमी आहे. आणि तो खालच्या ओळीत (सर) गेला आहे.
मोगरा कोमेजला पण..
दरवळे श्वासांत आता!
श्वासात हवे.
वाट मी पाहू किती?
थां | बू किती दिनरात आता?
वरच्या ओळी शेवटी एक गुरू कमी आहे. आणि तो खालच्या ओळीत (थां) गेला आहे.
का स्मृती उजळीत बसणे..?
राहिले हातात आता?
ते धुके.. अन तो किनारा
मिसळले दर्यात आता!